कौटुंबिक जीवन अन् आध्यात्मिक जीवन दोन्ही समजून घेतले पाहिजे

Foto
सागर प्रकाशनचे
साजवार्ता
Page No.: 8 Date: 02/11/2026
कौटुंबिक जीवन अन् आध्यात्मिक जीवन दोन्ही समजून घेतले पाहिजे
चिवरदान समारंभ : धम्मदेसनेतून आवाहन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आई वडिलांनी आपल्याला शीलवान, गुणवान बनवले पण बुद्धांनी भन्तेजींनी धम्म शिकवला, कौटुंबिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे दोन्ही समजून देतील आणि त्यामधून तुम्हाला काय घ्यायचे, कसे सुख मिळवायचे कसे ते वाढवायचे तसेच टिकवायच, हे तुम्हाला समजेल त्याच्यासाठी विसरू नका. शेवटी का होईना धम्माकडे या, संघाकडे या, तुमच्याकडून अपेक्षा आहे, असे भदंत बोधिपालो महाथेरो यांनी कठीण चिवरदान समारंभात धम्मदेसनेतून आवाहन केले.
तथागत सम्यक सम्बुद्धांच्या आदेशानुसार आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिन्यांच्या वर्षावासानंतर पवित्र कठिन चिवरदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पुज्य भदन्त काश्यप महाथेरो यांच्या वतीने भदन्त बोधीपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली लोकुत्तरा महाविहार चौका येथे भव्य कठिन चिवरदान समारंभ धम्ममय वातावरणात पार पडला. सूत्रसंचालन पू. भदन्त काश्यप महाथेरो
यांनी केले. प्रमुख धम्मदेशना भदन्त डॉ. समनवण्णो महाथेरो आणि भदन्त डॉ. एस. आर. इंदवंस महाथेरो यांनी केले. या सोहळ्यासाठी भदन्त डॉ. समनवण्णो महाथेरो, (सचिव-महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ) पु. भदन्त डॉ. एस. आर. इंद्रवंस महाथेरो, भदन्त डॉ. खेमोधम्मो महाथेरो, भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो, भदन्त प्रज्ञाबोधी महाथेरोभदन्त सत्यदिप महाथेरो, भदन्त डॉ. हर्षबोधी महाथेरो भदन्त नागसेनबोधी महाथेरो, भिक्खु राहुलबोधी महाथेरो, भिक्खु करुणानंद महाथेरो, भिक्खु ज्ञानरक्षित महाथेरो, भिक्खु अत्तदिप महाथेरो आदी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions